धर्म म्हणल की फ़क्त एकच आठवत ..
कर्मण्येवा धिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
कोणत्या अध्यायात गीतेमधे हा श्लोक भगवंतानी सांगितला हे मला माहित नाही. जेंव्हा हा श्लोक ऐकला तेंव्हा धर्म या सज्ञेबद्दलच्या माझ्या कल्पना बदलल्या, आपण नेहमी म्हणत असतो की मी हिंदू , तो मुसलमान , हा त्याचा मी ह्याचा, कधीकधी आम्ही अहिंसा परमो धर्म म्हणतो तर कधी कधी माणुसकी हा माझा धर्म अशा नैतिकतेच्या गप्पा आपण करत असतो.
जेंव्हा धर्म या संकल्पनेवर मी विचार करतो तेंव्हा मला अस वाटत की, आपल काम करत राहणे हाच खरा धर्म ते करत असतांना आपण योग्य करतोय का अयोग्य हा विचार करण म्हणजे नैतिकता .
हे करत असतांना फळाची चिंता करण आणि त्याच्या अभिलषेनी कामात अडथळा निर्माण होण म्हणजेच धर्माला गालबोट लागण आहे
अर्थात, या विषयावर अधिक लिहिण्याची माझी पण कुवत नाही कारण मी पण माणसानी तयार केलेल्या या धर्माच्या दुष्टचक्राचाच एक भाग म्हणून या समाजात वावरत आहे.
माझी हरकत नाही आणि असली तरी लोकांच्या आयुष्यात हरकत घेणारा मी कोण ? हा प्रश्नच आहे पण माझा या समाजव्यवस्थेचा भाग म्हणून जगत असतांना धर्माला विरोध करण हे योग्य नाही
मी जसा हिन्दू धर्माला मानतो तसाच अन्य धर्मांचा मला आदर आहे
माणसानी मांडलेला धर्मांतराचा खेळ हा सगळ्या धर्मांच्या मूळतत्वांना काळीमा लावणारा आहे
जस स्वामी विवेकानंद आपल्या भाषणात म्हणून गेले ...
"सर्वांनी आपापल्या धर्मात राहून स्वत:ची उन्नती साधावी"
हा सहिष्णुतेचा विचार मला परत एकदा मांडावासा वाटतो
' कर्म करते जा, फल की चिंता मत कर '
आणि हाच धर्म आहे अस माझ मत आहे
शेवटी शहाण्याला शब्दाचा मार ..
...धन्यवाद ...
टिप : कोणाला विचार पटले नसतील तर त्यावर चर्चा करू कारण वाद करून प्रश्न मिटत नाहीत ..

No comments:
Post a Comment