१५ ऑगस्ट २०१५ , शनिवार
स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्व भारतीयांना त्यांच्यातलाच एक बांधव या नात्यानी मनापासून सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो.
आज आपण स्वातंत्र्याच्या ६९ व्या वर्षात पदार्पण करत आहोत. तरी आपण व्यक्तिपूजेत आज किती आडकलो आहोत याच एक उत्कृष्ट उदाहरण आज मी पाहिल …
सकाळी ध्वजवंदन करायला महाविद्यालयात गेलो होतो. तिथे राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या चित्राच पूजन केल गेल. माझा महात्मा गांधींच्या पूजनाला विरोध नाही, पण भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी फ़क्त गांधीजींनी प्रयत्न केलेत अस नाही तर कित्येक विरांनी आपल्या प्राणांची आहुति दिली, तेंव्हा फ़क्त एकाच व्यक्तीची पूजा करण चूक आहे.
आम्ही या हुतात्म्यांना मानतो, त्यांच आमच्या मनात असलेल स्थान कुणीच नाकारु शकत नाही, पुण्यतिथी आणि जयंती साजरी करत असतांना आम्ही त्यांच्या प्रतिमांच पूजन करतोच.
जेंव्हा आपण स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनासारखे राष्ट्रीय सण साजरे करतो तेंव्हा कोणत्याही नेत्याच्या प्रतिमेच पूजन करण्याऐवजी भारतमातेच्या प्रतिमेच पूजन करणच योग्य आहे,
कारण, कोणतीच व्यक्ती ही कितीही मोठी असली तरी राष्ट्रपेक्षा मोठी नसते हे लक्ष्यात घ्यायलाच हव.
अर्थात, आज मी पहिल तिथे गांधीजींची प्रतिमा होती म्हणून मी त्यांच्या नावाचा दाखला दिला, जर तिथे अजुन कोणत्या नेत्याची प्रतिमा असली असती तर कदाचित त्यांचा उल्लेख उदाहरणात झाला असता.
शेवटी या सर्वांनी बलिदान केल ते भारतमातेच्या मुक्ततेसाठीच, हो ना ?
सर्वांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा…
आजचा अनुभव लिहायला अर्थातच खुप उशीर झाला त्यासाठी क्षमस्व ...
वंदे मातरम …
भारत माता की जय ....

Nice Expecting something boost on your blogs....
ReplyDelete