प्रत्येक वेळी आत डोकावण
प्रत्येकाला जमतचं अस नाही
जे डोकावून पाहू शकतात
तेच यशाची शिखर पदाक्रांत्र करतात
तस होण्यासाठी हवी असते
जिज्ञासा, डोळ्यातील तहान
अगदी ....
आता खिडकीतून वर्गात
डोकावणाऱ्या गोड मुलासारखी
ईच्छा अनेक गोष्टी जाणून घेण्याची
आणि न कंटाळणारी नजर
डोकवून पाहता यायलाच हवं
स्वतःच्या अंतर्मनात
तितक्याच निरागसपणे ..
त्या मुलाच्या गोड स्मित हास्यासारखं
- भार्गव हिरवे
(संगणक अभियांत्रिकी - अंतिम वर्ष)

No comments:
Post a Comment