Monday, August 10, 2015

कवीतांच संमेलन

एकदा कवीतांच संमेलन भरल
सगळ्या मुळातच दर्जेदार

आपापली पत सांभाळणाऱ्या
आपापल्या कुळाच नाव,
अभिमानानी उच्चारणाऱ्या

कुणी म्हणाली म्या  यमक
कुणी म्हणाली मुक्तछंद
कुणी खाला म्हणाल्या,
" हम गज़ल है ।"
तर लहान लहान मूली सांगत होत्या,
मी बड़बड़ी आणि मी चारोळी

कुणी म्हणाला, मी पोवाडा
तर कुणी म्हणाला , अभंग
त्याच्या उच्चारातून जाणवत होता,
मंदिराच्या गभार्यातला पवित्र घंटानाद

- भार्गव हिरवे
(संगणक अभियांत्रिकी - अंतिम वर्ष )

 

No comments:

Post a Comment